मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले असून त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.
अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात असून या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त हाती येत आहे.