मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला आहे.
अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.