तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। केंद्रीय राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
अधिक माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एक मोठा फेरबदल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना कायदेमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. तर आता त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदे मंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. अर्जुन राम मेघवाल आता त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे.
किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची अनेक विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमाला फटका बसत असल्याचेही बोलले जात होती. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याची शक्यता आधीच वर्तवली होती. त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं.