Breaking Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती ही पिटीशन आता सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून यामुळे मला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय लवकरात लवकर सुनावणी करेल. याच क्युरेटिव्ह पिटीशन च्या माध्यमातून मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असं मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.
https://fb.watch/p6C11CIqVY/?mibextid=RtaFA8
सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी मराठा आरक्षणा संदर्भात क्युरिटीव्ह पिटीशन स्विकारलेली आहे. येत्या 24 जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येईल असे आज न्यायालयाने स्पष्ट केले.बारा वाजून तेवीस मिनिटाला याबाबत माननिय न्यायमूर्तींनी सही करून त्या संदर्भात आदेश दिलेला आहे. मला विश्वास आहे, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार..विनोद पाटील