नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे .
यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांचे अपात्रता प्रकरण 31 डिसेंबर पर्यंत निकाली काढण्याचे आदेश दिले होते . या प्रकरणी सुनावणी २० डिसेंबरला संपणार आहे . यापुढे मुदतवाढ मागणार नसल्याची ग्वाही विधानसभा अध्यक्षांच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. परंतु विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी मागच्या सुनावणीलाही अशीच मुदतवाढ मागितल्याचे निदर्शनास आणून देत उद्धव ठाकरे गटातर्फे या मागणीला कपिल सिबल यांनी तीव्र विरोध केला.
धनुष्यबाणावरील सुनावणी लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी दोन फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. याची सुनावणी शुक्रवारी होणार होती शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल करण्याचा निकाल निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी १७ फेब्रुवारीला दिला होताण
निर्णयासाठी पुरेसा वेळ विधानसभा अध्यक्ष
हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत संपणार असतानाही आम्ही त्या खास सुनावणी घेतली आम्हाला दहा दिवस मिळतील तेवढा वेळ पुरेसा आहे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले
निर्णय देण्यापूर्वी दोन लाख 71 हजार पानाचा रस्ता ऐवज तपासावा लागणार आहे त्यामुळे वेळ द्यावी अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केली
काय आहे आमदार प्रकरण
शिवसेनेत फूट पडल्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटना पीठाने 11 मे 23 रोजी निकाल देताना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उचित कालावधीत निर्णय द्यावा असे निर्देश दिले होते