Breaking : आमदार अपात्रता सुनावणीस सुरुवात; शिंदे-ठाकरेंच्या वकिलांची खडाजंगी

मुंबई :  शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी सुरुवात झालीय. ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादादरम्यान खडाजंगी होत  आहे.  वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीका टिप्पणीवरअध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.

 

शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. 24  तारखेपर्यंत शिंदे गटाला वेळ देण्यात आलाय. कागदपत्र सादर करण्यासाठी हा वेळ देण्यात आलाय. ठाकरे गटाने आज कागदपत्रं सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रं ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे

 

सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा: ठाकरे गट

शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट  हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले जात आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली.

विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचा निर्वाळा अध्यक्ष नार्वेकरांनी दिला आहे. शिंदे यांनी पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत ते बंद दारामागे होऊ नये आणि अध्यक्षांनी त्यावर काय रुलिंग दिलं ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावं,  अशी देखील माहणी कामात यांनी   केली आहे