अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
अभिनेत्री दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारकडून SIT चौकशी करणार आहे. याबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार, १२ डिसेंबर) राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विरोधकांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या चौकशीचीही मागणी केली होती. त्यामुळे आता या चौकशीत अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी वारंवार केली जात होती. तसेच कालच उद्धव ठाकरे यांनी आम्ही जर तुमच्या एस आय ट्या लावल्या तर तुम्हांला खूप अडचण होईल.. असे विधान केले होते. त्यानंतर आता लगेच एसआयटी करण्याचे आदेश दिल्याने आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.