Samruddhi, Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काल झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ह्युडांई व्हेरना गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेडहून मुंबईकडे जाताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरला धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.