जामनेर : घरात विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना फत्तेपूर, ता.जामनेर येथील वीज कंपनीच्या टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सिनी.टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार व खाजगी ईसम कलीम तडवी अशी लाचखोरांची नावे आहेत. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी झाला.