---Advertisement---

मोठी बातमी! लाचखोर ग्राम विकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव : गटारी व गावहाळ बांधण्याचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात पडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, नितीन भीमराव ब्राम्हणे (वय 37, खर्दे बुद्रुक, ता धरणगाव, जळगाव) असे अटकेतील लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या गावात गटारीचे 2 लाखाचे व गावहाळ बांधण्याचे 70, 000 रुपयाचे अशी 2,70,000 रुपयाचे काम केले होते. आलोसे ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे 1,95,000 व 69,000 अशे 2 स्वतंत्र चेक दिले होते व सदर बिलाची एकूण रक्कम 2,64,000 रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती.

तक्रारदार यांच्या कामाची बिले व सदर बिलांचे 2 चेक काढून दिले या कामाचा मोबदला म्हणून आलोसे ग्रामसेवक यांनी तक्रादार यांच्याकडे 10 टक्क्याप्रमाणे 25,000/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार केली. त्यानुसार आज, 22 रोजी जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई सापळा रचत लाचखोर ग्राम विकास अधिकाऱ्याला 25,000/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले असून, या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment