पाचोरा : पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) या खाजगी पंटरास सातबार उतार्यावर बोजा बसवून देण्याचे काम करून देण्यासाठी लाच घेताना जळगावच्या एसीबीने रंगेहाथ अटक केली. लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी एक लाख 30 हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उतार्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (44, बांबरूड, ता.पाचोरा) यांनी तक्रारदाराकडे एक हजार 360 रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास बांबरूड येथे आरोपीच्या घराजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला.
Jalgaon! सातबारा उतार्यावर बोजा बसवण्यासाठी लाच; खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात
by Ganesh Wagh
Updated On: मे 17, 2023 2:07 pm

---Advertisement---