नववधूची मंगळग्रह मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

अमळनेर :  येथील श्री मंगळग्रह मंदिरावर अहमदनगर येथून आलेल्या नववधूने हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी करुन आशीर्वाद घेतले. यावेळी
भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली तसेच अनेक भाविक मंदीरावरून जमिनीवर पडलेल्या फुलपाक प्रसादस्वरूप घरी नेत असल्याचं चित्र दिसून आले.

 

शहरातील प्रसिध्द बिल्डर व डेव्हलपर सरजूशेट गोकलानी व त्यांच्या परिवाराचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर श्रध्दास्थान आहे. मुलगा आशिष याचा काही दिवसापुर्वी अहमदनगर येथील सीमरनशी विवाह निश्चित झाला. १० रोजी हा विवाह येथे होणार असून आज ९ रोजी साखरपुडा व हळद होते. त्यासाठी अहमदनगर येथून हेलिकॉप्टरमधून आलेल्या नववधू सिमरन यांनी मंगळग्रह मंदिरावर पुष्पवृप्टी करुन आशीर्वाद घेतले. त्यानंतर सिमरन विवाहस्थळी रवाना झाल्या.

दरम्यान मंदिरावर पुष्पवृष्टी होणार ही बाब पूर्वनियोजित असल्याने अनेकांना माहित होते. त्यामुळे भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली अनेक भाविकांनी तर मंदीरावरून जमिनीवर पडलेल्या फुलपाक प्रसादस्वरूप घरी नेत असल्याचं चित्र दिसून आले.