धरणगाव : प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही शासन नियमानुसार क्रम प्राप्त असते. मात्र, आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये आपण केलेले कार्य स्मरणात राहिले पाहिजे. त्या कार्यालयाला निवृत्तीनंतर देखील आपली उणीव भासली पाहिजे असं कार्य करणारे शिक्षक समाजासाठी आदर्श असतात, शिवाय शिक्षकांसाठी अश्रू ढालणारे विद्यार्थी पाहिल्यावर हाच खरा आदर्श शिक्षक पुरकार आहे असे वाटते. विद्यार्थी आणि संस्थेला हवेसे वाटणारे शिक्षक आदर्शाच्या उच्च शिखरावर असतात, असे मत पी. आर. हायस्कूल सोसायटीचे संचालक अजय पगारिया यांनी व्यक्त केले.
विद्यालयातील गणित विज्ञान विषयाचे शिक्षक उमाकांत बोरसे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ.आशा शिरसाठ पर्यवेक्षक कैलास वाघ ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी के पाटील, बहादरपूर विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र चौधरी, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रा. बी एन चौधरी, संजय अमृतकर,एस ई मिसर ,सेवानिवृत्त ज्येष्ठ लिपिक सुरेश बोरसे ,सौ लीलावती बोरसे, सत्कारमूर्ती उमाकांत बोरसे,सौ.सुरेखा बोरसे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री पगारिया म्हणाले की, अलीकडे एक एक करून संस्थेच्या चांगल्या शिक्षकांची सेवानिवृत्ती होत आहे या शिक्षकांचे गुणगान करत असताना त्यांचा आदर्श समोर ठेवून इतर शिक्षकांनी भविष्यात मार्गक्रम करावे त्यामुळे शिक्षकांची उज्ज्वल परंपरा कायम टिकून राहील. यावेळी संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, माध्यमिक शिक्षक संघ, टीडीएफ ,मुख्याध्यापक संघ ,जळगाव जिल्हा पतसंस्था ,धरणगाव एरंडोल तालुका माध्यमिक शिक्षकांची पतसंस्था, विविध सामाजिक संस्था, मातोश्री नगर, नातेवाईक, आप्तेष्ट,सेवानिवृत्त कर्मचारी संघटना,यांच्याकडून उमाकांत बोरसे यांच्या सपत्नीक गौरव करण्यात आला. गणेश सिंह सूर्यवंशी,प्रशांत महाजन ,कैलास वाघ,डॉ आशा शिरसाट,डॉ मिलिंद डहाळे ,सी के पाटील, एडवोकेट संजय बोरसे ,साक्षी बोरसे, डॉ अरुण कुलकर्णी ,उमकांत बोरसे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉ संजीवकुमार सोनवणे, सूत्रसंचालन डी एस पाटील, आभार बापू शिरसाठ यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र धनगर सुरेंद्र सोनार संजय बेलदार,संदीप घुगे,जितेंद्र बोरसे, सुरेश ओस्त्वाल ,वसंतराव चौधरी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.