BRO मध्ये 411 जागांवर भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज?

#image_title

दहावी उत्तीर्णांना BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. BRO ने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात काढली आहे. या नोकरीबाबत अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी marvels.bro.gov.in वर जाऊन अर्ज करावा.

या भरतीद्वारे एकूण 411 जागा भरल्या जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज मुदतीपूर्व करावा. BRO Bharti 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) MSW (कुक) – 153
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
2) MSW (मेसन) -172
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Building Construction/Bricks Mason)
3) MSW (ब्लॅकस्मिथ) -75
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker)
4) MSW (मेस वेटर)- 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा

या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षा, पीईटी, प्रॅक्टिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 5200/- ते 20200/- पर्यंत पगार मिळेल

हेही वाचा : दारू पाजून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; नेता आणि गायकावर गंभीर आरोप

इथे पाठवावा लागेल अर्ज?
या नोकरीसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांना फिजिकल टेस्टसाठी GERF,सेंट्र, डिग्गी कॅम्प, आळंदी रोड, पुणे ४११०१५ येथे बोलवले जाईल.