---Advertisement---

जळगाव जिल्हा हादरला! माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

---Advertisement---

जळगाव : कानसवाडा गावातील माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. युवराज कोळी असे खून झालेल्या उपसरपंचाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानसवाडा गावातील तिघांनी आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात चाकू आणि चॉपरने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून, नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे.

तणावाचे वातावरण

कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण असून खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच

माजी उपसरपंच युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment