12वी उत्तीर्णांना देशसेवेची सर्वात मोठी संधी..! BSF मध्ये 247 पदांवर भरती
12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात 247 पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हीही जर या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला www.bsf.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 मे 2023आहे.
ही पदे भरली जाणार?
अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) च्या 217 पदे आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या 30 पदांची भरती करायची आहे.
भरतीसाठी आवश्यक पात्रता
उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र, बारावीनंतर आयटीआय केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
वयो मर्यादा : 12 मे 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
तुम्हाला किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-4 रु. 25500/- ते 81100/- 7 व्या CPC नुसार पगार मिळेल
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online