तरुण भारत लाईव्ह । भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी सकाळी आठ ते चार या वेळेत शहरातील जामनेर रोडवरील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात होते तर ५६० पैकी ५५२ (९८.५७) मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी एकत्र येत भुसावळातील भाजपाचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्याविरोधात लढा दिला मात्र या निवडणुकीत परिवर्तन घडले असून आमदार संजय काकडे ठरले आहे. या निवडणुकीत भाजपला १५ तर विरोधकांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. ‘शेतकरी विकास’ या अजेंड्यावर लढण्यात आलेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला साथ देत बाजार समितीत परीवर्तन घडवले. आमदार खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.