अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे. आता देशातील 3 कोटी महिलांना सरकारच्या ‘लखपती दीदी योजने’चा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकार अर्थसंकल्पात तरतूदही वाढवणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आतापर्यंत देशातील 1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी योजने’चा लाभ मिळाला आहे. सुरुवातीला २ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते आता ३ कोटी करण्यात आले आहे. या योजनेत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपये आहे.