केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असून, यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे.
या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या योजनांचा एकूण चार कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार असल्याचंही सीतरामन यांनी स्पष्ट केलं.
केंद्रातील मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन याचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.
रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.