Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत असून, यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पीएफ दिला जाईल. त्यांच्या एका महिन्यांचा पगार तीन टप्प्यात पीएफमध्ये देण्यात येणार आहे. एका लाखापर्यंत पगार असणारे युवक त्यासाठी पात्र ठरणार आहे. जास्तीत जास्त 15,000 रुपये त्या युवकांना देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा दोन कोटी नवीन कर्मचाऱ्यांना होणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, शासनानेही विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी मॉडेल स्किल लोन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे मॉडेल स्किल लोन मिळेल. 25,000 विद्यार्थ्यांना मॉडेल स्किल लोनचा फायदा होईल. 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवणार आहे. तसेच शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
महिलांचा कार्यशक्तीमध्ये सहभाग वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना डीबीटी सुविधा मिळेल. याशिवाय पीएम योजनेंतर्गत 20 लाख तरुणांना कुशल केले जाईल. सरकार येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कौशल्य बनवणार आहे. मुद्रा लोनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता वीस लाखांपर्यंत मुद्रा लोन मिळणार आहे, असे सांगितले.