मुंबई : तुकोबारायांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचनाला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. यंदाचे वैशिष्ट म्हणजे, पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन करण्यात येत आहे. वाचा महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
५ वर्षांत ३००० कोटी रुपये उपलब्ध करून देणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा
आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्यांकडून
आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
शेतकर्यांना केवळ १ रुपयांत पीकविमा
३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
पर्यावरणपूरक विकास
शेतकर्यांसाठी बजेटमध्ये अनेक योजना
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ अमृत योजना सांगताना पहिले अमृत हे शेतकर्यांच्या हितासाठीचं असल्याचं सांगितलं. त्यानुसार, केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ करण्यात आली. त्यात, आता राज्य सरकारच्यावतीने ६ हजार रुपये वार्षिक निधी देण्यात येईल. त्यामुळे, ही रक्कम १२ हजार एवढी होणार आहे.
शेतकर्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करणार
किल्ले शिवनेरीवर संग्राहलय उभारणार आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शेतकर्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करणार आहे.
धनगर समाजासाठी १००० कोटी रुपये
२२ योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
१० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
अहमदनगर येथे मुख्यालय असणार
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या, शेतकर्यांना निवारा-भोजन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी, थेट रोखीने आर्थिक मदत
विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देणार
नागपुरात कृषी सविधा केंद्र,विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
या केंद्रासाठी २२८ कोटी रुपये देणार
नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /२० कोटी रुपये तरतूद
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, ३ वर्षात १ हजार कोटी निधी
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
१००० जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
३ वर्षांत १००० कोटी रुपये निधी