तरुण भारत लाईव्ह । ५ एप्रिल २०२३। प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो ज्याचा प्रभाव शुभ किंवा अशुभ स्वरूपात तसेच कमी अधिक प्रमाणात सर्व १२ राशींवर दिसून येतो. एक लाभदायक योग म्हणजेच बुधादित्य राजयोग येत्या १० दिवसांनी तयार होत आहे. तीन अशा राशी आहेत ज्यांना या काळात बुधादित्य राजयोगाने बलाढ्य धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होणार हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
मेष रास
बुध व सूर्याची युती आपल्या राशीच्या लग्न स्थानी तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला येत्या काळात इतर म्हणजेच तुमचे जोडीदार किंवा व्यसायातील भागीदार यांच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकतो. बुध ग्रह हा साहस, पराक्रम, रोग व शत्रू यांचा कारक आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत केली असेल त्यात यश लाभू शकते.
कर्क रास
बुधादित्य राजयोग हा आपल्या राशीचं कर्मस्थानी तयार होत आहे यामुळे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कामाचे माध्यम बदलले जाणवून येऊ शकते. या नव्या मार्गाने तुम्ही खोऱ्याने पैसे ओढू शकाल. तुमच्या हातून विनाकारण खर्च होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे पगार किंवा कोणताही आर्थिक फायदा होताच त्यातील ठराविक रक्कम वेळीच बाजूला काढून ठेवणे योग्य ठरेल.
सिंह रास
बुधादित्य राजयोग हा सिंह राशीच्या भाग्य व कर्म स्थानी तयार होत आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश झाल्याने तुमच्या भाग्यात पदोन्नतीचे संकेत आहेत. तुमच्या राशीत बुध ग्रह हा धन व आर्थिक प्राप्तीचा स्वामी मानला जातो. यामुळे बुधाच्या आशीर्वादाने तुम्हाला अपार धनलाभ व श्रीमंतीची संधी मिळू शकते.