तरुण भारत लाईव्ह । १४ मे २०२३। १५ मे रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, बुध 7 जून रोजी या राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रहांच्या राशी बदलामुळे सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधादित्य योग अत्यंत फायदेशीर मानला गेला आहे. बुधादित्य योगामुळे तीन राशीच्या लोकांना फायदा होईल हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कन्या रास
बुधादित्य योग निर्माण झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच, व्यवसाय क्षेत्रात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ रास
सूर्य आणि बुध यांच्या संयोगाचा शुभ प्रभाव कुंभ राशीवर दिसतो. या काळात जंगम किंवा स्थायी मालमत्तेची खरेदी शुभ ठरू शकते.
मीन रास
बुधादित्य योग निर्माण झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील. यासोबतच आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. सर्जनशील कार्यात वाढ होऊ शकते.