---Advertisement---

पावसाचा हाहाकार; महापूरात वाहून गेल्या इमारती; व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

नवी दिल्ली : हिमाचल, पंजाब, दिल्लीसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. देशभरात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत लष्कराच्या दोन जवानांसह १६ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशात नद्यांना पूर आला असून या पुराच्या पाण्यात अनेक घरं वाहून गेली आहेत. या वाहून गेलेल्या घराचे व्हिडिओ आता समोर आले आहेत.

उत्तर भारतात पावसाचे मुसळधार आगमन झाल्यानंतर येथील नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. काही नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर, शिमला, कुल्लू, मंडी, बिलासपूर आणि सिरमौर जिल्ह्यातील सतलज, ब्यास आणि यमुनासह त्यांच्या उपनद्यांना पूर आल्याचे चित्र आहे.

सरकार आणि प्रशासनाने स्थानिक यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या असून धैर्य बाळगण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. आपत्कालीन मदतीसाठी १०७७ हा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. दरम्यान, ब्यास नदीच्या प्रवाहात नदीशेजारी असलेली एक इमारत कोसळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही इमारत कोसळून चक्क नदीच्या प्रवाहात वाहून गेलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिमाचल प्रदेशमधील पूरस्थिती दर्शवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment