राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत जळगावमध्ये मोठी भरती ; फटाफट करा अर्ज

JOB : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक संधी चालून आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत जळगाव येथे विविध पदांच्या 54 जागांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, दंतवैद्य आणि तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

हृदयरोगतज्ज्ञ – एमबीबीएस & एमडी / एमएस / डीएम कार्डिओलॉजी सह MMC नोंदणी
स्त्रीरोगतज्ञ – एमबीबीएस & एमडी/एमएस/डीजीओ सह MMC नोंदणी
बालरोगतज्ञ – एमबीबीएस & एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच सह MMC नोंदणी
भूलतज्ज्ञ – एमबीबीएस & एमडी/ एमएस / डीए / डीएनबी सह MMC नोंदणी
चिकित्सक – एमबीबीएस & एमडी (औषध) सह MMC नोंदणी
वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस सह MMC नोंदणी
दंतवैद्य – बीडीएस / एमडीएस सह MMC नोंदणी
तंत्रज्ञ – डेंटल हायजिनिस्ट- (एनसीडी) 12वी विज्ञानासह आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये डिप्लोमा राज्य दंत परिषदेकडे नोंदणी (02 वर्षांचा अनुभव) एक्स-रे तंत्रज्ञ – (IPHS) – 10+2 सह डिप्लोमा संबंधित फील्ड (01 वर्षाचा अनुभव)ऑडिओमेट्रिक सहाय्यक – (NPPCD) 12 वी सह डिप्लोमा संबंधित अभ्यासक्रम

वयाची अट : 17 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
शुल्क : 150/- रुपये [SC/ST – 100/- रुपये]
अर्ज अंतिम दिनांक : 05 मे 2023

किती पगार मिळेल?
17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).