---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । १४ एप्रिल २०२३। स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे जारी अधिसूचनेनुसार विविध विभागातील १०२२ पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यात विशेषत्वाने चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर आदी पदांची पदभरती केली जाणार आहे.
या पदभरती प्रक्रियेसाठी प्राप्त अर्जापैकी उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे. १०० गुणांसाठी असलेल्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. ही भरती SBI द्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या पदांसाठी फक्त SBI किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेतील निवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतात. इतर विस्तृत माहितीसाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.