ISRO मध्ये बंपर रिक्त जागा, 10वी पासलाही मिळेल सरकारी नोकरी, जाणून घ्या कुठे अर्ज करावा

तुम्हीही ISRO मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने प्रोपल्शन कॉम्प्लेक्ससाठी काही रिक्त जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने 24 एप्रिल 2023 करावा. एकूण पदसंख्या : 63

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक: 24 पदे तंत्रज्ञ ‘बी’: 30 पदे ड्राफ्ट्समन ‘बी’: 1 पद अवजड वाहन चालक ‘A’: 5 पदे हलके वाहन चालक ‘A’: 2 पदे फायरमन ‘ए’: 1 पोस्ट

आवश्यक पात्रता: अर्ज करू इच्छिणारे उमेदवार त्यांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादींबद्दल संपूर्ण माहितीसाठी येथे तपशीलवार अधिसूचना पाहू शकतात.

निवड प्रक्रिया : इस्रोच्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. प्रत्येक पदासाठी कौशल्य चाचणी वेगळी असू शकते. जसे ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग टेस्ट, फायरमनसाठी शारीरिक चाचणी इ.

अर्ज फी: इस्रोच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक सहाय्यक पदासाठी रुपये ७५० आणि इतर पदांसाठी ५०० रुपये भरावे लागतील.

नोकरी ठिकाण: तमिळनाडु

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023 (04:00 PM) जाहिरात (Notification): पाहा Online अर्ज: Apply Online