---Advertisement---

Amoda Bus Accident : प्रवाशांनी भरलेली बस अचानक पुलावरुन थेट नदीत कोसळली, एकाचा जागीच मृत्यू

---Advertisement---

भुसावळ प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून एक अपघाती मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी बसला हा अपघात झाला असून, ती पुलावरून बॅरिकेट तोडून थेट नदीत कोसळली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा मूळ नदीच्या पुलावर आज रविवारी पहाटे प्रवाशी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला. इंदोरहून भुसावळकडे येणारी खासगी बस (एमपी 09- 9009) ही आमोदा मूळ नदीच्या पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट नदीत कोसळली. ही घटना आज रविवारी (६ जुलै) रोजी पहाटे घडली. दरम्यान, अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टळला मोठा अनर्थ

दुसरीकडे नदीला पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामुळे आमोदा, मोर नदीवरील पूलाच्या भागातील अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---