---Advertisement---

Chopda News : चोपडा आगाराचा अजब कारभार! विना फलकाच्या धावताय बसेस

---Advertisement---

चोपडा : राज्यात पहिला क्रमांक मिळवलेल्या चोपडा आगाराचा सध्या भोंगळ कारभार सुरु आहे. या आगारातील बहुतांश गाड्या विना फलकाच्या धावत आहेत. बसेसवर गावांचे फलक नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. बस नेमकी कोणत्या मार्गाने धावत आहे किंवा धावणार हे कळत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चोपडा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात लावण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गावांचे फलक नसल्याने चालक स्वतः हाताने चुन्याच्या माध्यमातून जाणाऱ्या मार्गाचे नाव लिहून गाड्या हाकताना दिसतात. गावी जाणारा मार्गाचा फलक डेपोत नसल्याने बहुतांश गाड्या विना फलकाच्या हाकल्या जातात. चोपडा डेपोकडे अद्यापही जुन्या गाड्या सुरू असून या गाड्यांना फलक नाहीत. मागे काही वर्षांपूर्वी गावातील जाहिरातदारांनी फलक बनवून दिले होते. यंदा मात्र त्यांनीही डेपोकडे पाठ फिरवल्याचे दिसते. डेपोचे बाह्यरंग बदलले असले तरी किरकोळ बाबींमध्ये अद्यापही मागासलेपण दिसून येते.

आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्या कारकिर्दीत हा डेपो राज्यात पहिल्या क्रमांकावर आला. डेपोला बक्षीसही मिळाले. असे असताना काही गाड्यांना फलक न लागल्याने ती कमतरता भासते. बऱ्याच वेळेला उ‌द्घोषक गाडी लागण्याआधीच उद्‌घोषणा करतात. नंतर गाडी लागते. फलाटावर गाडी कुठे लागते याचा प्रवासी शोध घेतात. त्या आधीच काही प्रवासी

दरम्यान, जळगाव व ठाणे येथील फलक बनवणाऱ्या संस्थांशी बोलणे झाले आहे. त्यानुसार आकर्षक स्वरूपाचे रंगीत नामफलक लवकरच तयार करण्यात येणार आहेत. ४१० कर्मचाऱ्यांच्या हातांनी हे फलक हाताळले जातात. तरीही माझ्याइतके फलक, नामफलक या डेपोत कोणीही बनवले नाहीत, अशी माहिती चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment