‘ऑप्टिनेक्स’ वेबसाइटवर गुंतवणूक करा, म्हणत जळगावातील व्यावसायिकाला घातला ४५ लाखांचा गंडा

---Advertisement---

 

जळगाव : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी आणि हॉलिडे दूर ऑपरेटरला शालिनी गौडा नामक महिलेने ‘ऑप्टिनेक्स मार्केट्स’ नावाच्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली.

ऑप्टिनेक्स या वेबसाइटवर गुंतवणूक केल्यास कमी वेळेत मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला दूर ऑपरेटरने भरलेल्या रकमेवर ४ हजार ५६० रुपयांचा अधिकचा नफा मिळाला, त्यानंतर, अधिक नफ्याच्या आशेने त्यांनी ७ ते ३० ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्याने तब्बल ४५ लाख रुपये ऑनलाईन भरले. मात्र, ही रक्कम परत मिळाली नाही.

या प्रकारानंतर टूर ऑपरेटरने ३ सप्टेंबर, बुधवारी सायबर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२० (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे पढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---