धक्कादायक! भुसावळमध्ये व्यावसायिकाला लुटले; २५ लाख ४२ हजार रुपये लंपास

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : तालुक्यातील सत्यसाई नगर परिसरात एका व्यासायिकाकडून २५ लाख ४२ हजार रुपये रोकड तीन अनोळखी इसमांनी बळजबरीने हिवसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री १०:२० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी मोहम्मद यासीन हे त्यांच्या मोटारसायकलवर (क्र. MH १९ BC ५५८६) निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी पैशांची थैली समोर ठेवून घराकडे जात होते. सत्यसाई नगर येथील कॉम्प्लेक्सजवळील रस्त्यावर (सार्वजनिक जागा) तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला मुद्दाम धडक दिली. धडकेमुळे मोटारसायकलवरील थैली खाली पडली. या संधीचा फायदा घेऊन आरोपींनी फिर्यादीच्या ताब्यातून थैली बळजबरीने हिसकावून घेतली आणि पसार झाले. फिर्यादींनी घटनेची माहिती तात्काळ भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दिली.

चोरी मालाचा तपशील असा

२५,००,०००/- रुपये (५०० रुपयांच्या नोटा).
ऑफिसचे ४२,०००/- रुपये
एकूण: २५,४२,०००/- रुपये (निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी थैलीसह).
सदर गुन्ह्याचा तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) महेश गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेत आहेत.

भुसावळ पोलीसांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या रकमेची वाहतूक करताना सावधगिरी बाळगण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी (१००) संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---