जळगावच्या रणरणत्या उन्हात ‘दिलखुश’ मठ्ठ्याचा गारवा ! (व्हिडिओ)

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, वाढलेल्या तापमानामुळे प्रचंड उष्णता वाढली आहे. रस्त्यावरून जाताना बसणाऱ्या झळा असह्य होत आहेत. सकाळी ९ वाजल्या पासूनच उन्हाच्या झळांचा त्रास जाणवत आहे. झळा वाढल्यामुळे दुपारी कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक सावली शोधत आहेत. तसेच उन्हाच्या झळांपासून थोडा दिलासा मिळावा यासाठी स्वातंत्र्य चौकातील ‘दिलखुश मठ्ठा कॉर्नर’ येथे नागरिकांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.