Byju’ company : सर्वात मोठी स्टार्टअप कंपनीला या कारणामुळे बायजू’ कंपनीला लागणार टाळं

Byju’ company :    2014 मध्ये  Byjus कंपनी सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी बनली होती. परंतु आता परिस्थिती अशी आहे की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांना त्यांची सर्व मालमत्ता आणि बायजूचे शेअर्स गहाण ठेवावे लागले आहेत. स्टार्टअप कंपनीला आता आपली कार्यालये बंद करण्यास भाग पाडले जात आहे.

 

बायजू ही देशातील पहिली युनिकॉर्न कंपनी होती. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी ज्याचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स आहे. कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले.

 

बायजूच्या मूळ कंपनी थिंक अँड लर्नने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी प्रेस्टीज ग्रुपकडून बेंगळुरूमधील मालमत्ता भाडेतत्त्वावर घेतली होती. या कार्यालयाच्या जागेसाठी कंपनी दरमहा चार कोटी रुपये भाडे देत होती.

 

बायजूने खर्च कमी करण्यासाठी  प्रेस्टीज टेक पार्क, बेंगळुरू येथे 4 लाख चौरस फूट कार्यालयाची जागा रिकामी केली. या कार्यालयाच्या जागेचा भाडे करार संपला आहे. कंपनीचा जमीनमालकाशी अनेक मालमत्तांबाबत वाद सुरू आहे.

 

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बेंगळुरूमधील कंपनीच्या आणखी एका कार्यालयावर  टाच  आली  आहे

बायजूने गेल्या 10 महिन्यांपासून मालमत्तेचे भाडे दिलेले नाही. त्यामुळे  कल्याणी बिल्डर्सने डिपॉझिटमधून 7 महिन्यांचे भाडे कापून बायजूला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.