---Advertisement---
मुंबई : राज्य मंत्रीमंडळाने बुधवारी घेतलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. निर्णयांमुळे सर्वसामान्याच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. बैठकीत सरकारने कामाच्या तासांबाबत चर्चा करुन बदल करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयांमुळे कामांच्या तासात वाढ होणार आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार ९ तास काम करीत होता, आता तो दहा तास करण्यात आला आहे. राज्य सरकारने कामकाजाचे तास वाढवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.
या निर्णयाने रोजगार निर्मिती करणे, गुंतवणूक आकर्षित करणे,आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करनयाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे . कामाचे तास आता ९ तासांवरून १० तासांवर जाणार असून सरसामन्यांच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होताना दिसणार आहे.
कारखाने अधिनियम 1948 मध्ये विविध सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचना केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने या सुधारणांना मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. कामांच्या तासात बदल हा राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, देशातील इतर राज्यांमध्ये या निर्णयाचा अंमलब केला जात आहे. या कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. कामाच्या तासातील वाढीमुळे कामगारांनाही वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला मिळेल. अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल. अतिकालिक कामाचा कालावधी 125 तासांवरुन 144 तास करणे आदी सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी या निर्णयामुळे कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल असे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.