तरुण भारत लाईव्ह । मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिना आधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले जात आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दि. ४ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात प्रभाव न पाडू शकलेल्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्यांची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांचा समावेश होणार असून लोकसभेसाठी फायदेशीर ठरणाऱ्यांना मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान या बैठकीत रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेचा वर्धापन दिनाआधीच म्हणजे दि. १९ जूनपुर्वी व्हावा याबाबत शिंदेंनी बैठकीत भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात भाजपच्या मिशन ४५ वर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून लोकसभेसाठी फायदेशीर ठरणाऱ्या चेहऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकली जाऊ शकते.