Call Merging Scam : तुम्हालाही असा कॉल येतोय का? वेळीच सावध व्हा, अन्यथा रिकामं होईल बँक खातं

Call Merging Scam : देशात फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅमर नागरिकांची बँक खाती रिकामी करत आहेत. मिस्ड कॉल स्कॅमनंतर आता ‘Call Merging Scam’ नावाचा नवा घोटाळा समोर आला आहे. यामध्ये युजरच्या कोणत्याही गोपनीय माहितीशिवाय, फक्त एका ओटीपीच्या (One-Time Password) मदतीने खात्यातील रक्कम लंपास केली जाते.

नेमकं काय आहे Call Merging Scam?

नेशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि UPI यांच्याकडून या नव्या घोटाळ्याविषयी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये फसवणूक करणारी टोळी युजरला फोन करते आणि नोकरी, बँक अपडेट किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉल केल्याचे सांगते. त्याच वेळी, ते युजरच्या ओळखीच्या व्यक्तीशी देखील संवाद साधत असल्याचे भासवतात.

युजरला कॉल मर्ज करण्यास सांगितले जाते, पण प्रत्यक्षात दुसरा कॉल ओटीपीसाठी आलेला असतो. स्कॅमर कॉल मर्ज झाल्यावर तो ओटीपी ऐकतात आणि लगेचच बँक खात्यातून पैसे काढतात. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना कोणताही पासवर्ड किंवा अन्य गोपनीय माहिती लागत नाही.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

सरकार आणि आर्थिक संस्थांकडून सतर्कतेचा इशारा

केंद्र सरकार आणि विविध आर्थिक संस्थांनी या घोटाळ्याबाबत तातडीने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. NPCI नं X (माजी ट्विटर) वरून माहिती देत सांगितले की, कॉल मर्जिंग तंत्राचा गैरफायदा घेत फसवणूक केली जात आहे.

Call Merging Scam टाळण्यासाठी काय कराल?

अनोळखी कॉल उचलताना काळजी घ्या: अनोळखी क्रमांकावरून आलेला कॉल उचलताना सतर्क राहा.

कॉल मर्ज करण्यास नकार द्या: कोणीही कॉल मर्ज करण्यास सांगितल्यास तसे करू नका.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

OTP कोणालाही शेअर करू नका: कोणत्याही परिस्थितीत ओटीपी शेअर करू नका.

संशयास्पद कॉल आल्यास 1930 वर तक्रार करा : जर तुमच्या माहितीसह किंवा त्याशिवाय एखादा OTP आला असेल, तर तत्काळ 1930 क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती द्या.

बँक व अधिकृत UPI अॅपच्या नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवा: तुमच्या खात्यातील कोणत्याही संशयास्पद व्यवहारांची माहिती लगेच बँकेला द्या.