Jalgaon Crime : चोरीसाठी आले अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

 

Jalgaon Crime : जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे चोरीच्या हेतूने संशयास्पद पध्दतीने बुधवारी रात्री फिरणाऱ्या ग्रामस्थांना गस्तीवरील फत्तेपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी कटर, २ मोबाईल व दुचाकी जप्त केली.

संशयित शाहरुख रज्जाक तडवी, अयनोद्दीन अब्बास तडवी व मयूर विठ्ठल माळी (सर्व कोल्हे, ता. पाचोरा) हे खडकी नदीवरील पुलावर संशयास्पदरितीने फिरत असल्याचे ग्रामस्थ सोपान जोशी, निलेश जोशी व आकाश जोशी यांना आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिस सचिन पाटील यांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आम्ही विजेच्या तारा व झटका मशीन चोरण्याच्या हेतूने फिरत असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचारी निलेश राठोड यांच्या तक्रारीवरुन तिघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार किशोर राठोड तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---