---Advertisement---

नोकरीच्या शोधात जळगावात आला अन्… काय घडलं?

---Advertisement---

जळगाव : नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (२२), रा. धामणगाव ता.मोताळा जि.बुलढाणा असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीस सूत्रानुसार, अंकुश सुरळकर हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरूवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून बाहेर पडला मात्र, तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू, काहीच माहिती मिळाली नाही.

दरम्यान, शनिवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मन्यारखेडा गावानजीक असलेल्या तलावात त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. नशिराबाद पोलीसांनी पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  तपास सहाय्यक फौजदार हरीष पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment