Dharangaon : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिना निमित्त वाणिज्य विभाग, मराठी विभाग, स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल व एनएसएस विभागातर्फे एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय शिंगाणे हे अध्यक्ष स्थानी होते.
सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंगाणे, प्रा. राजू केंद्रे, प्रा . सदिप पालखे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शिंगाणे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवकानंद यांचा जीवनपट उपस्थित स्वयंसेवकांसमोर मांडला.
टी. वाय. बी. ए. चे विद्यार्थिनी प्रणिता सोनवणेने स्त्री शिक्षणावर आधारित एकांकिका उपस्थित विद्यार्थ्यांसमोर सादर केली. यानंतर मराठी विभाग व वाणिज्य विभागातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दिवसभरासाठी स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांसाठी ऑनलाइन क्विझचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रामध्ये भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचे नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरातील, राष्ट्रिय यावा दिना निमित्त नवयुवकांसमोर केलेले व्याख्यानचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयातील उपस्थित स्वयंसेवकांना दृक श्राव्य प्रणाली द्वारे दाखविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या डॉ. तायडे मॅडम तर आभार वाणिज्य विभागाचे.डॉ गौरव महाजन यांनी मानले. डॉ. भालेराव, एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. जोशी, डॉ.गौरव महाजन, डॉ. ज्योती महाजन, प्रा. योगेश पाटील, प्रा.क्षत्रिय, प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.