पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत मविआ विरोधात भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने एकेक करून जवळपास सगळ्याच दिग्गजांना निवडणूक प्रचारात उतरवलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील गेल्या काही दिवसांपासून प्रचारात उतरले आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये बावनकुळे यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
बावनकुळे काय म्हणाले?
खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. आपण बिनविरोधसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 वोल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये. असा त्यांना धडा शिकवा, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.