मुंबई : अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केल्या आहेत. शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं याचिकेतून वगळण्यात आली आहेत.
अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल करुन शरद पवार गटाच्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावं याचिकेतून वगळण्यात आली आहेत.
राज्यसभेत शरद पवार गटातर्फे वंदना चव्हाण आणि फौजिया खान तर लोकसभेत श्रीनिवास पाटील आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याआधी, अजित पवार गटातील खासदार प्रफुल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करा अशी शरद पवार गटाने मागणी केली होती. शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत शिष्टमंडळाने राज्यसभा सभापतींची भेट घेत प्रफुल पटेल यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा गटानेही प्रत्युत्तर दिल्याचं दिसत आहे.