Cannabis plants । शेतकऱ्याने केला कहर, शेतात लावली गांजाची झाडं; गुन्हा दाखल

#image_title

नंदुरबार । पैसा कमवण्यासाठी कोण, कधी, कशी शक्कल लढवेल याचा नेम नाही.  शहादा तालुक्यातील घोटलेपाडा व लंगडी भवानी येथे एकाने गजांची झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी धाड टाकत तब्बल अडीच क्विंटल गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहादा तालुक्यातील घोटलेपाडा येथे एकाने शेतात गांजाची झाडे केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे, उपनिरीक्षक मराठे, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी, आतिक पटेल यांच्यासह धाड टाकली.

या कारवाईत २ क्विंटल ३२ किलो ८०० ग्रॅम गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुमान ठोबल्या पावरा रा. घोटलेपाडा, ता. शहादा याच्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, लंगडी भवानी येथील दिलवरसिंग रायसिंग भिल याने शेतात ८ किलो २२० ग्रॅम गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकत आठ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजन मोरे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, विकास शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी, आतिक पटेल, देवा विसपुते, युवराज राठोड यांनी ही कारवाई केली. नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी भेट देत पंचनामा केला.