पुणे : भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत आज सकाळी एक कार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली. यात तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते त्यापैकी एक जण बचावला असून तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघात ग्रस्त हे पुण्यातील रावेर येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीम चे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.