---Advertisement---

खुशखबर ! अकरावी प्रवेश प्रक्रिया होणार सुकर, पोर्टलवर करिअर मार्गदर्शनाची सुविधा सुरू

---Advertisement---

Maharashtra 11th Admission Portal : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवेशाबाबत मार्गदर्शन व नोंदणी केंद्रही सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पालकांनी व विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

मार्गदर्शन सुविधा

ही सुविधा सोमवारी (२६ मे) रोजीपासून सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी जेव्हा या टॅबवर क्लिक करतील तेव्हा एक पृष्ठ उघडेल. ज्यात वर्णानुक्रमाने करिअर यादी दिलेली असेल. प्रत्येक करिअरसमोर कामाचे स्वरूप, आवश्यक पात्रता आणि पुढे शिकायचे अभ्यासक्रम यांची सविस्तर माहिती दिलेली असेल. आणखी अधिक माहिती हवी असल्यास https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आवाहन

धुळे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावीचे प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी देवपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्याख्यांसाठी प्रवेशाबाचत मार्गदर्शन व नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी पालकांनी व विद्याश्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डी. बी. पाटील यांनी केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment