तुम्ही ‘हे’ सूप ट्राय केलंय का?

तरुण भारत लाईव्ह ।२७ जानेवारी २०२३। आपल्या आरोग्यासाठी सूप पिणे हे फायदेशीर असते. खासकरून हिवाळ्यामध्ये सूप पिणे हे फायदेशीर असते. टॉमॅटोचे सूप, कॉर्न सूप, कारले सूप या प्रकारचे सूप तुम्ही ट्राय केले असणार यासारखेच गाजराच सूप तुम्ही कधी ट्राय केलं आहे का? गाजराच सूप कस बनवलं जात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
1 चमचा लोणी, 1 चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑयल, एक चिरलेला कांदा, चिमूटभर ओवा, 2 लवंगा आणि 2 लसूण, 5 चिरलेले गाजर, 2 कप पाणी, 4 कप व्हेजिटेबल शोरबा, ½ लहान चमचा मीठ, स्वादानुसार काळी मिरपूड.

कृती
ओव्हनमध्ये किंवा गॅसवर बॉऊलमध्ये लोणी घालून त्या कांदा आणि ओवा घाला, उकळून घ्या. लसूण घाला आणि परतून घ्या. गाजर घालून मिसळा. पाणी आणि शोरबा घाला आणि उकळी येऊ द्या. 20 मिनिटे शिजवून बंद करा. गार झाल्यावर ब्लेंडरमध्ये प्यूरी तयार करा. प्यूरी हवं तितकं पाणी घालून मीठ, मिरपूड घालून पुन्हा गरम करा आणि मग सर्व्ह करा.