रेल्वेमध्ये या वस्तू नेत आहात? थांबा, प्रवासाला आहे मनाई

नवी दिल्ली : तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल तर मनाला वाटेल तशा वस्तू घेऊन गेल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. ज्या वस्तूंमुळे प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण होईल अशा वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास केल्यास तुम्हाला केवळ दंडच नाही तर तुरुंगवास देखील होऊ शकतो.

भारतीय रेल्वेने ट्रेन आणि प्रवाशांची सुरक्षा पाहून अनेक वस्तूंसह प्रवास करण्यावर निर्बंध आणले आहेत. ट्रेनचा प्रवास करताना अनेक वस्तूंना प्रतिबंधित केले आहे. यात अशा वस्तू आहेत की ज्याच्यामुळे ट्रेनला आग लागु शकते, ट्रेन अस्वच्छ होऊ शकते, अन्य प्रवासांना असुविधा आणि ट्रेनचा अपघात होऊ शकतो अशा वस्तूंवर बंदी आहे. या वस्तूंसोबत कोचमधून प्रवास करण्यावरच नव्हे तर लगेजच्या डब्यातूनही नेण्यास बंदी आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणत्याही स्वरुपातील ज्वलनशील केमिकल, फटाके, एसिड, दुर्गंधीयुक्त पदार्थ, चमडे किंवा ओले चामडे, पाकिटातून नेता येणारे तेल, ग्रीस ज्याच्या गळतीने अन्य प्रवासी आणि त्यांच्या सामानला नुकसान होईल, रेल्वेच्या नियमानूसार किमान 20 किलोग्रॅमपर्यंत तूप तुम्ही घेऊन जाऊ शकता.परंतू तूपाच्या डब्यांना नीट पॅक करायला हवे.

रेल्वे प्रवासात प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करण्यास मनाई आहे. जर कोणी प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करताना सापडला तर त्याला रेल्वे कायदा कलम 164 अनूसार कारवाई होऊ शकते. या कलमांतर्गत प्रवाशावर 1000 रुपयांपर्यंत दंड किंवा तीन वर्षांचा कारावास वा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.