---Advertisement---

Bhusawal Crime : तृतीयपंथीयाला खंडणीची धमकी, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : भुसावळच्या खडकारोड, सत्यसाईनगर येथील तृतीय पंथीयास ५०० रूपयांची खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ४ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास घडली होती. अशपाक उर्फ आम्रपाली जाबीर बागवान (३२) या तृतीयपंथीयास ही धमकी देण्यात आली आहे. दररोज ५०० रुपयांची खंडणी मागून, न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

अम्रपाली बागवान या घरी असताना विजय सोनार, भावेश उर्फ भावना, अश्विनी उर्फ आशु श्रावण बाविस्कर, राजेश उर्फ राखी तुळशीराम सूर्यवंशी, आकाश उर्फ रूपाली आणि नितीन उर्फ गोलू संगत हे सहाजण त्यांच्या घराबाहेर येऊन धिंगाणा घालू लागले. त्यांनी आपल्या व्यक्तीविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.

तसचे दररोज ५०० रुपये देण्यास सांगितले अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी आम्रपाली बागवान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---