Jalgaon Crime : गैरमार्गाने मिरवणूक, दोघांवर गुन्हा

---Advertisement---

 

जळगाव : पारंपरिक मार्गाने मिरवणूक न काढता गैरमार्गाने मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नितीन नत्थू महाजन व सागर सुधाकर चौधरी (रा. महात्मा फुले चौक, रावेर) यांनी ६ सप्टेंबर रोजी दुपारी हा प्रकार केल्याची फिर्याद पो.हे.कॉ. हिरालाल गुमळकर यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबट्याने पाडला गाईचा फडशा

नशिराबाद : येथील विलास नाईक यांच्या विमानतळाजवळील शेतात शेतमजुरी करणारे संजय युवराज भील यांच्या गाईवर ३ सप्टेंबर रात्री बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडला.

सकाळी शेतात गाईचे अवशेष आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभसागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातू करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---