कारखान्यातून चक्क ९५ हजाराच्या काजूची चोरी

एरंडोल : येथे अगम काजू कारखान्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीतून प्रत्येकी २०किलोचे ५ काजूचे बॉक्स अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल येथे जळगाव रस्त्यालगत असलेल्या अगम कॅश्यू कॉर्पोरेशन नामक काजू च्या कारखान्यातून एम.एच.१९ सी.वाय.६७९७ क्रमांकाच्या वाहनात ठेवलेल्या ९५हजार रुपये किंमतीच्या काजू चे ५ खोक्यांवर अज्ञाट चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना २४डिसेंबर २०२३ रोजी रात्री घडली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सुनिल लोहार हे करीत आहेत.