कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतुक, बजरंग दलाच्या सतर्कतेने २०० पेक्षा अधिक गुरांना जीवदान

---Advertisement---

 

झारखंड राज्यात पोलिसांनी २०० पेक्षा अधिक गुरांना जप्त करण्याची कारवाई केली. गुरे ठेवण्याच्या जागे अभावी सर्व गुरांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याने पोलीस स्टेशनचे गोठ्यात रूपांतरण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या नंतर गुरांची दुसऱ्या गोठ्यात रवानगी करण्यात आली. बजरंग दलाने गोवंश तस्करीचा आरोप केला असून पोलिसांनी कत्तलीसाठी त्यांची वाहतूक केल्याचा पुरावा नसल्याचे कारण दिले.

झारखंडमधील गढवा येथे गुरुवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जवळपास २०० गुरांना जप्त करण्यात आले. या सर्व गुरांना गढवा येथील एका पोलीस चौकीत आणण्यात आले. या गुरांना ठेवण्यासाठी कोणतीही जागा नसल्याने त्यांचा तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा मुक्काम पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आला. यामुळे पोलीस स्टेशनला गोशाळेचे रूप आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ही गुरे गढवापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेल्या पलामू जिल्ह्यातील एका गोशाळेत पाठवण्यात आली.

आपण कथित गोवंश तस्करीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली होती असा दावा बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख सोनू सिंह यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करीत गायी जप्त केल्या. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधून लहान गटांमध्ये गुरांची तस्करी केली जात होती. या काळात सुमारे २५० जनावरांची सुटका करण्यात आली. तीन जणांना अटक करण्यात आली.

पण गढवाचे पोलिस एसपी अमन कुमार यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्यांनी पुढे असेही सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आठवड्याच्या बाजारासाठी येथे सुमारे १७० जनावरे आणण्यात आली होती. जनावरांचा व्यापार सामान्य आहे. त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पुरावे असले पाहिजेत.

---Advertisement---

 

पोलिसांच्या मते, पोलिसांकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे आणि ते केलेल्या दाव्यांची पडताळणी करत आहेत. प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या प्रकरणात, बजरंग दलाच्या नेत्याने या रॅकेटमागे काही मोठे लोक असल्याचा आरोप केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---